राज्यातील आशासेविकांचा संप अखेर मागे !

मध्यभागी राजेश टोपे

मुंबई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आशासेविकांच्या कृती समितीच्या झालेल्या बैठकीनंतर राज्यातील आशासेविकांनी घोषित केलेला संप मागे घेतला आहे. आरोग्यमंत्र्यांनी मानधनात १ सहस्र रुपये इतकी वाढ करण्याचा आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचे आश्वासन आशासेविकांना दिले आहे. राज्यातील ७० सहस्र आशासेविकांनी १५ जूनपासून संप चालू केला होता.