१० ऑक्टोबरला खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर सुनावणी 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने आणखी १३ दिवसांची वाढ केली आहे. २७ सप्टेंबर या दिवशीच्या सुनावणीत संजय राऊत यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे.

 ‘ईश्‍वर अवतार घेत नाही, पुनर्जन्म आणि मोक्ष या कल्पना ही सत्यशोधक समाजाची शिकवण !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु धर्माचे ज्ञान असलेला एकही वक्ता व्यासपिठावर नसतांना हिंदु धर्माविषयी अगाध ज्ञान असल्याप्रमाणे वक्तव्य करणारे स्वत:ला ‘सत्यशोधक’ म्हणवतात, हेच मुळात हास्यास्पद होय !

‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको ! – तान्या, संपादिका, ‘संगम टॉक्स’ यू ट्यूब चॅनेल

आजपर्यंतचा इतिहास पहाता नवरात्रीतील गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश नको; कारण गरब्यात सहभागी होणार्‍या हिंदु मुलींना फूस लावली जाते !

‘पी.एफ्.आय.’वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का ? – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

संपूर्ण देश पी.एफ्.आय.च्या विघातक कारवायांची उकल करणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्या पाठीशी असतांना क्षुल्लक राजकारणापोटी या कारवायांवरच प्रश्नचिन्हे निर्माण करणार्‍या विरोधकांचा हेतू शंकास्पद आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

मेट्रोच्या कामामुळे विलेपार्ले येथे ८ घरे कोसळली, ४० पेक्षा अधिक घरांना तडे

विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड इंदिरानगर परिसराजवळ ३० दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचे काम चालू आहे. मेट्रोच्या कामाच्या हदर्‍यांमुळेच झोपड्या कोसळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घाला !

मुळात अशी मागणी करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? उघडपणे अमली पदार्थांची विक्री होते, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे !

नारायण राणे यांच्या बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाकडून कायम !

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नारायण राणे यांनी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज केला होता; मात्र सर्वाेच्च न्यायालयाने राणे यांचा अर्ज फेटाळून लावला.

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना वेळीच ठेचा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

भारतातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठी जर आवळल्या, तर या लोकांना कुठे पळावे लागेल, हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

जीवघेण्या ‘हिमोफिलिया’ आजारावरील औषधांच्या खरेदीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष !

इंजेक्शनअभावी होणारा रक्तप्रवाह रुग्णांसाठी जीवघेणा !

मुंबई येथून ‘फोन पे’चे कार्यालय कर्नाटक राज्यात जाणार !

आस्थापनाने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात पालटण्यास सक्षम होण्यासाठी आस्थापन कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे.