मुंबई येथून ‘फोन पे’चे कार्यालय कर्नाटक राज्यात जाणार !

मुंबई – ‘ऑनलाईन’ पैसे देण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘फोन पे’ आस्थापनाचे मुख्य कार्यालय मुंबई येथून कर्नाटक राज्यात नेण्याचा निर्णय आस्थापन व्यवस्थापनाने घेतला आहे. याविषयी आस्थापनाने विज्ञापनही प्रसिद्ध केले आहे. आस्थापनाने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात पालटण्यास सक्षम होण्यासाठी आस्थापन कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. यासाठी आस्थापनाच्या ‘मेमोरेंडम ऑफ असोसिएशन’मध्ये फेरफारची पुष्टी मिळावी, यासाठी १६ ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या आस्थापनाच्या आमसभेत विशेष ठराव संमत करून वरील निर्णय घेण्यात आला.