मुंबई होत आहे मुसलमानबहुल !

हिंदूबहुल महाराष्ट्राची राजधानी असणार्‍या मुंबईसाठी ही धोक्याची घंटा नव्हे का ? याचा सर्वच हिंदूंनी गांभीर्याने विचार करावा !

विसर्जनानंतर देवतेच्या मूर्तीची छायाचित्रे काढून ती प्रसारित केल्यास कारवाई ! – मुंबई पोलीस

मुंबईचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी पत्रक काढून देवीच्या मूर्ती विसर्जनाच्या प्रसंगाचे छायाचित्र काढणे व प्रसारित करणे यांवर बंदी घातली आहे.

पी.एफ्.आय.चा आर्थिक स्रोत बंद केल्याविना तिच्या आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना ‘पी.एफ्.आय.’ला आर्थिक साहाय्य करत आहेत, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी.

सांस्कृतिक प्रसाराचे सूर !

एकीकडे श्री सरस्वतीदेवीच्या वीणेला सन्मानित करत असतांना महाराष्ट्रातील करंटे नेते मात्र ‘तिचे चित्रही शाळांमध्ये नको’, अशी बौद्धिक दिवाळखोरी व्यक्त करत आहेत. त्यांच्या विरोधामुळे देवी सरस्वतीचे चित्र शाळेतून हटणार नाहीच; उलट कालगतीनुसार वैश्विक स्तरावर तिचा जयजयकार होईल, हा या भव्य वीणेचा संदेश आहे !

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते, ते आमच्याकडे आहे. या देशात जे काही निर्णय होतात ते घटना, नियम यांच्या आधारेच होत असतात.

पोलीस दलातील रिक्त पदांच्या १०० टक्के भरतीला मंत्रीमंडळाची मान्यता !

२० सहस्र पोलिसांच्या भरतीचा मार्ग मोकळा ! वन्यप्राण्यांच्या आक्रमणात मरण पावलेले वन अधिकारी आणि कर्मचारी यांना हानीभरपाई मिळणार !

शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुणाला काय वाटते, ते करणार नाही. शाळांमधील श्री सरस्वतीदेवीची चित्रे काढली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर मांडली.

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचाच !

शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पक्षचिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय घोषित करू, नये अशी याचिका ठाकरे गटाने सर्वाेच्च न्यायालयात केली होती.

पोलीसदलाच्या आधुनिकीकरणाचा पुनर्प्रस्ताव केंद्रशासनाला पाठवण्यात येणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

लव्ह जिहादच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासमवेत ही प्रकरणे कायमची बंद होण्यासाठी ठोस उपाययोजना अपेक्षित आहे !