‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना वेळीच ठेचा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने धाड टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अटक केल्यामुळे पुणे येथे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचले पाहिजे, असे आवाहन ट्वीटद्वारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.


यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, आतंकवाद्यांना साहाय्य करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी ही अटक झाली आहे. असे असतांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या अन् पाकिस्तानात चालते व्हा ! असले प्रकार आमच्या देशात चालणार नाहीत. केंद्र आणि राज्य येथील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, केवळ या देशद्रोह्यांना नव्हे, तर त्यांच्या समर्थकांनाही वेळी अद्दल घडवा.

देशद्रोही रूपी कीड समूळ नष्ट करा !

भारतातील आणि महाराष्ट्रातील हिंदूंच्या मुठी जर आवळल्या, तर या लोकांना कुठे पळावे लागेल, हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा. यातच भारताचे हित आहे’, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.