(म्‍हणे) ‘ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण, त्‍यांच्‍यावरील धर्मांतराचे खोटे आरोप थांबवा !’

आरोप सिद्ध होण्‍याच्‍या अगोदरच ‘खोटे आरोप’, असे कसे काय म्‍हणता येईल ? धर्मांतर करतांना अनेक ख्रिस्‍ती धर्मगुरूंना पकडले आहे, अनेकांनी धर्मांतर केल्‍याचे मान्‍यही केले आहे.

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एकवटला हिंदु समाज !

भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांसह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

हिंदूंनी आज संघर्ष केला, तरच त्‍यांची पुढची पिढी सुरक्षित राहील ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

महाराष्‍ट्र राज्‍यासह संपूर्ण देशात धर्मांतर, लव्‍ह जिहाद, गोहत्‍या विरोधी कठोर कायदे व्‍हावेत, या मागणीसाठी या मोर्च्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.  या वेळी आमदार टी. राजासिंह यांनी प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अफझलखानाच्‍या कबरीवरील अतिक्रमण काढल्‍याविषयी शासनाचे अभिनंदनही केले.

घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !

देशात ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ विरोधी कायदे करण्‍यास सरकारला बाध्‍य करा ! – टी. राजासिंह

संपूर्ण भारतामध्‍ये ‘धर्मांतर’, ‘लव्‍ह जिहाद’ यांच्‍या विरोधात कायदे झाले पाहिजेत. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ हे संपूर्ण भारतामध्‍ये नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. हे आताच थांबवायला पाहिजे.

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात सहस्रावधी हिंदू रस्‍त्‍यावर उतरणार ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

२२ जानेवारी या दिवशी घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

ख्रिस्‍ती समाज आणि चर्च यांवरील अन्‍याय-अत्‍याचार थांबवा ! – ख्रिस्‍ती समाजाची मूक मोर्च्‍याद्वारे मागणी

ख्रिस्‍ती समाज आणि चर्चवर यांवर अन्‍याय-अत्‍याचार होत आहे. हे तात्‍काळ थांबावे आणि त्‍यासाठी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ख्रिस्‍ती समाजाने जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

पुणे येथे धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

धर्मांतर, गोहत्‍या आणि लव्‍ह जिहाद’ यासाठी कडक कायदे करावेत, आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘बलीदान दिवस’ हा ‘धर्मवीरदिन’ म्‍हणून साजरा करण्‍यात यावा, यासाठी २२ जानेवारी या दिवशी या मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

‘श्री सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करावे !

जैन समाजाच्‍या या मागणीचे समर्थन करत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही मोर्च्‍यात सहभागी झाले होते. मोर्च्‍यात जैन समाजबांधव मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.