‘श्री सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करावे !

कारंजा (लाड) (जिल्‍हा वाशिम) येथे जैन समाजाची मूक शांती मोर्च्‍यात आग्रही मागणी

मोर्च्‍यात सहभागी झालेले जैन बांधव

कारंजा (लाड) (जिल्‍हा वाशिम) – जैन धर्मियांची आस्‍था असलेल्‍या ‘श्री सम्‍मेद शिखरजी’ या पवित्र क्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटनक्षेत्र म्‍हणून घोषित केले होते; परंतु या धार्मिक स्‍थळाला तीर्थक्षेत्र म्‍हणून घोषित करावे, या जैन समाजाच्‍या मागणीसाठी कारंजा येथील सकल जैन समाजाच्‍या वतीने ‘मूक शांती मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले होते. जैन समाजाच्‍या या मागणीचे समर्थन करत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही मोर्च्‍यात सहभागी झाले होते. मोर्च्‍यात जैन समाजबांधव मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.