‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला’ देण्यासाठी सातारा नगर परिषदेकडून १०० रुपये शुल्क आकारणी !

‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नगर परिषदेकडून नि:शुल्क दाखला दिला जावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढता विरोध !

अनेक ठिकाणी कार्यक्रमात हुल्लडबाजी होऊन तोडफोडही झाली असतांना जिल्ह्यातही तसेच होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी, असे प्रशासनाला अभिप्रेत आहे का ?

‘मी मंत्री सावेंचा पी.ए.’, मर्जीप्रमाणे गुन्‍हा नोंद करा !’

याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्‍हणाले की, संबंधित व्‍यक्‍ती माझी स्‍वीय साहाय्‍यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.

पनवेल-कळंबोलीजवळ मालगाडी घसरल्‍याने रेल्‍वे सेवा विस्‍कळीत होऊन प्रवासी त्रस्‍त !

लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्यांमधील प्रवाशांची गैरसोय टाळण्‍यासाठी प्रयत्न न करणारे निष्‍क्रीय रेल्‍वे प्रशासन !

नागपूर येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांकडून गोंधळ !

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाविषयीच्या पूर्वानुभवावरून गणेशोत्सवाच्या काळात असे कार्यक्रम आयोजित करणे कितपत योग्य ? याचा राजकीय पक्षांनी विचार करावा ! 

मिरज येथे ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय !

परिसरातील नागरिकांनी मिरवणुकीत चालू असलेल्या ‘डॉल्बी’च्या आवाजामुळे त्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा, असे सांगितले. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर गणेशभक्तांकडून नैसर्गिक जलस्रोेतात विसर्जनास प्राधान्य !

शास्त्रानुसार कृती करणेच श्री गणेशाला अपेक्षित आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकच कृती अध्यात्मशास्त्रानुसार करावी !

नाशिक येथील शाळेच्या आवारात गौतमी पाटील हिच्या अश्‍लील नृत्याचा कार्यक्रम !

शाळेच्या आवारात अश्‍लील नृत्यासाठी कुप्रसिद्ध असणार्‍या नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणे, हे नैतिकतेचे झालेले हननच होय !

 ३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

अशा शाळांची मान्यता रहित केली पाहिजे आणि अन्य कॉन्व्हेंट शाळांमध्ये काय चालू आहे ?, याचाही शोध घेतला पाहिजे !