नांदेडमध्ये युवकाने ई.व्ही.एम्. यंत्रावर कुर्‍हाडीने घाव घातले !

चामराजनगर (कर्नाटक) येथेही ई.व्ही.एम्. यंत्राची हानी !

प्रतिकात्मक चित्र

नांदेड – येथील रामतीर्थ मतदान केंद्रावर भानुदास भडके या युवकाने कुर्‍हाडीने ई.व्ही.एम्. यंत्र तोडले. या वेळी तो ओरडून ओरडून ‘घटना वाचवण्यासाठी मी हे करत आहे’, असे सांगत होता. येथील कर्मचार्‍यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असता त्याने त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथे उपस्थित पोलिसांनी त्याला पकडले. ‘कंट्रोल युनिट’ असल्याने यातील मते सुरक्षित आहेत, असे संबंधित कर्मचार्‍यांनी सांगितले. ५०० जणांनी येथे मतदान केले होते. २६ एप्रिलला देशातील १३ राज्यांत ८८ जागांवर लोकसभेसाठी मतदान झाले.

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील इंडिगनाथा गावातील मतदान केंद्रावर ‘मतदान करायचे कि नाही ?’ या सूत्रावरून दोन गटांत बाचाबाची झाली. या वेळी त्यांनी ई.व्ही.एम्. यंत्राची हानी केली. गावाचा विकास न झाल्याने आरंभी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला होता. स्थानिक अधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मतदानप्रक्रिया चालू केली.

संपादकीय भूमिका :

युवक कुर्‍हाड घेऊन मतदान यंत्राजवळ पोचेपर्यंत पोलीस झोपले होते का ?