उत्तरपत्रिका पडताळणारे २ प्राध्यापक निलंबित !
जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापिठाच्या ‘फार्मसी’ पदवी परीक्षेत ४ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये ‘जय श्रीराम’ आणि विराट कोहली, रोहित शर्मा अन् हार्दिक पंड्या या क्रिकेटपटूंची नावे लिहिली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना उत्तीर्णदेखील करण्यात आले. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने २ प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली. विद्यापिठाचे माजी विद्यार्थी दिव्यांशू सिंह यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या माहितीतून ही गोष्ट उघडकीस आली.
In #UttarPradesh, 4 students who wrote #JaiShreeRam and cricketers' names in their answer scripts pass the Pharmacy degree exams
2 professors who valued the answer scripts suspended
This matter came to light through information obtained by former student Divyanshu Singh under… pic.twitter.com/wAOnnkLNoS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2024
सदोष उत्तरपत्रिका तपासणीविषयी दिव्यांशू यांनी राजभवनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर राजभवनाने २१ सप्टेंबर २०२३ या दिवशी चौकशीचा आदेश दिला. विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीत २ प्राध्यापकांना दोषी ठरवण्यात आले. त्यानुसार डॉ. आशुतोष गप्ता आणि डॉ. विनय वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे, असे विद्यापिठाच्या कुलगुरु डॉ. वंदना सिंह यांनी सांगितले.