७ सहस्र १७३ पैकी १ सहस्र ६८७ गावांतच कामे पूर्ण !
हिंगोली – मराठवाड्यात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘नळ पाणीपुरवठा योजने’च्या कामांसाठी दीड वर्षात तब्बल १ सहस्र ६७९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तसेच ७ सहस्र १७३ पैकी केवळ १ सहस्र ६८७ गावांतील कामेच पूर्ण झाली आहेत. संथ कामांमुळे कामे कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, तर दुसरीकडे अधिकार्यांना प्रतिमहा भेटी देण्याच्या सूचना असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. अपूर्ण कामांमुळे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. योजनेची अनुमाने ७५ टक्के कामे अद्याप रखडली आहेत.