नागपूर विमानतळ बाँबने उडवण्याची धमकी !

नागपूर – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांनी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली आहे. संचालकांना ‘सी.आय.एस्.एफ्.च्या’ ई-मेलवर नागपूर विमानतळ उडवण्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमानतळाच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. या प्रकरणी उच्चस्तरीय अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूरसह मुंबई, गोवा, भोपाळ, कोलकाता आदी शहरांतील विमानतळांनाही अशीच धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका :

अद्यापही विमानतळे बाँबने उडवण्याची धमकी मिळणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !