नवी देहली : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हनुर तालुक्यातील इंदिगनाथा गावात लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेरमतदानाला आरंभ झाला. २६ एप्रिल या दिवशी झालेल्या मतदानाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची हानी झाल्याने मतदान थांबवण्यात आले होते. विशेष म्हणजे गावात पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची चेतावणी यापूर्वी दिली होती; मात्र जिल्हाधिकार्यांनी नागरिकांना आश्वासन दिल्यानंतर ते मतदान करण्यास सिद्ध झाले होते. एक गट मतदानाच्या बाजूने होता, तर दुसरा गट बहिष्कार घालण्याची मागणी करत होता. यावरून या गटांत हाणामारी झाली.