मुंबई सीबीआय पथकाने नाशिकमध्ये वरिष्ठ विपणन अधिकार्‍याला लाच घेतांना पकडले !

अशा प्रकरणांमुळे ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ असे होण्याऐवजी ‘भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेला भारत’ अशीच प्रतिमा निर्माण होत आहे. हे पालटण्यासाठी महत्त्वाच्या खात्यांमध्ये राष्ट्रप्रेमी आणि प्रामाणिक व्यक्ती असणे आवश्यक !

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांकडून बेमुदत संप चालू !

हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्‍या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटांची स्वच्छता करण्याची गणेशभक्तांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

गणेशोत्सवासाठी राज्य पातळीवर ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण

गणेशोत्सवातील अधिक बसगाड्यांची मागणी लक्षात घेता नवीन गाड्या खरेदी करून त्यांचा वापर होण्याची प्रक्रिया आधीच का झाली नाही ?

संपादकीय – पर्यावरणप्रेम : हिंदुविरोधी अजेंडा !

हिंदूंचे सण आले की, ‘पर्यावरणाचे प्रदूषण’ या शब्दांचा इतका भडीमार केला जातो की, जणू सर्व प्रदूषण हिंदूंच्या सण-उत्सवांमुळेच होते. याचा बागुलबुवा इतका केला जातो की, महाराष्ट्र सरकारही आता ‘पर्यावरणपूरक उत्सव’ ही संकल्पना राबवायला लागले आहे !

जत येथील रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ सत्यनारायण महापूजा !

रस्त्याची कामे होण्यासाठी असे सोहळे राबवण्याची वेळ येणे दुर्दैवी ! प्रशासन स्वतःहून त्यांचे काम का करत नाही ?

महापालिकेकडे श्री गणेशमूर्तींचे दान करून सेंद्रिय खत मिळवा !

धर्मशास्त्रानुसार मूर्तीदान अयोग्य आणि अशास्त्रीय आहे. केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच भाविकांच्या धर्मभावनांचा विचार न करता अशा प्रकारे आवाहने केली जातात.

पुतळा ३५ फूट उंच असेल, याची आम्हाला माहिती नव्हती ! – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय

पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

आगाऊ रक्कम दर्शन साखळीत ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’पैकी कुणी आहे का ? याची चौकशी करा !

पंढरपूर येथे ठाणे येथील भाविक श्री. चेतन काबाडे यांनी ४ सहस्र रुपये रक्कम श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिली. या प्रकरणी दर्शन झाल्यावर पावती न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

प्रदूषित इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचा व्यय !

कोट्यवधी रुपये व्यय करूनही नदीचे प्रदूषण अल्प न होणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! नदीमध्ये मिसळले जाणारे सांडपाणी बंद करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !