जुनी सांगवी (जिल्हा पुणे) – गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे मुळा, पवना नद्यांना आलेल्या पुरामुळे जुनी सांगवी, दापोडी परिसरातील घाटांवर कचरा, गवत वाढल्याने सर्वत्र अस्वच्छता झाली आहे. आता गणेशोत्सव आला असल्याने येथील घाटांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी गणेशभक्तांकडून केली जात आहे. धरण परिसरात गेल्या आठवड्यात पडलेला पाऊस आणि वेळोवेळी मुळशी, पवना धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्याने आठवडाभर नदीपात्र दुथडी भरून वहात होते. या परिसरातील अहिल्यादेवी होळकर घाट, ‘गणपति(मूर्ती) विसर्जन घाट’ पाण्याखाली होते. एक दिवसाचा, दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर घाटांवर येतात. त्यामुळे या घाटांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
जुनी सांगवी येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन घाट आणि वेताळ महाराज उद्यान प्रवेशद्वारासमोर उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने परिसरामध्ये घाण साचली आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |