महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !

महाराष्ट्रात मात्र २०१२-२०१७ या पंचवार्षिक क्रीडा धोरणानंतर नवीन क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही. या जुन्या धोरणावरच क्रीडा धोरणाचा कारभार चालू आहे. यातून राज्याची क्रीडाक्षेत्राविषयीची अनास्था दिसून येत आहे.

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्‍या जनमाहिती अधिकार्‍यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !

राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था

अस्वच्छ नदीघाट, नाल्याचे पाणी थेट पंचगंगा नदीत !

E. Sreedharan On Kerala Temples : हिंदूंच्या मंदिरांना येणारी समस्या दूर करण्यासाठी प्रसिद्ध अभियंते ई. श्रीधरन् यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका

प्रश्‍न हिंदूंच्या मंदिरांचा असल्यामुळेच केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने ई. श्रीधरन् यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, यात आश्‍चर्य ते काय ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !; आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !…

दिंडोशीमधील बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत.

श्री गणेशोत्सवापूर्वी पुणे शहरातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करणार !

खड्डे बुजवण्यासाठी गणेशोत्सवाचे कारण कशाला हवे ? एरव्हीच सर्व रस्ते खड्डेमुक्त असायला हवेत, असे वाटणारे प्रशासन हवे !

कोंढवा (पुणे) येथील अनधिकृत दूरभाष केंद्राच्या प्रकरणी ए.टी.एस्.कडून ३ जणांना अटक !

एवढी वर्षे अनधिकृत दूरभाष केंद्र चालू असूनही पोलिसांना त्याचा काहीच सुगावा कसा लागला नाही ? ही पोलिसांची कार्यक्षमता आहे का ?

एस्.टी.च्या संपामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला !

४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.

गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे.

पिंपरी (पुणे) येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुला’तील कृत्रिम धावमार्ग उखडला !

याविषयी महापालिका प्रशासनाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !