विजय वडेट्टीवार यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना हे लक्षात येत नाही का ?

Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !

जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक (ता. मावळ) येथील अवैध मशिदीचे बांधकाम त्वरित थांबवावे !

मशीद अवैध असतांनाही तिच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही ? आता तरी तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का ?

उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !

शिवसेनेच्या आमदारांनी उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचा आदेश दिला.

देवगड (सिंधुदुर्ग) : नळपाणीपुरवठा योजनेचे काम चालू न केल्याने साळशी येथे पाणीटंचाई !

मूलभूत सुविधांसाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

मारहाण करणार्‍या धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी !

जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला.

एकतर्फी प्रेमातून हत्या झालेल्या तरुणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवा ! – राष्ट्रीय जंगम संघटना

दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.

उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव

उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

कराड शहरातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे भुईसपाट करण्याचे आदेश द्यावेत ! – शिवशंकर स्वामी, मानद पशूकल्याण अधिकारी

निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.