लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक (ता. मावळ) येथील अवैध मशिदीचे बांधकाम त्वरित थांबवावे !

नागरिकांची पोलीस प्रशासनासह ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ला निवेदनाद्वारे मागणी !

समस्त कुसगाव बुद्रुककर ग्रामस्थ

लोणावळा (जिल्हा पुणे) – शहराजवळील कुसगाव बुद्रुक (ता. मावळ) येथे गेल्या काही दिवसांपासून धर्मांधांकडून अवैधरित्या मशीद उभारण्याचे काम चालू करण्यात आले आहे; परंतु हे काम करत असतांना कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता न करता तसेच शासनाची अथवा स्थानिक ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची अनुमतीही न घेता मनमानी पद्धतीने हे काम केले जात आहे. त्यामुळे हे काम त्वरित थांबवावे, या मागणीसाठी समस्त कुसगाव बुद्रुककर ग्रामस्थ एकवटले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनासह ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ला (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) निवेदन दिले आहे, तसेच ग्रामपंचायतीने संबंधित मशीद ट्रस्ट चालकांना नोटीसही बजावली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसगाव बुद्रुक येथील गट नंबर २०८, २०९ मध्ये सदर बांधकाम होत असून येथे तात्पुरते ८० बाय ४० चौरस फुटांमध्ये २० ते २५ फुटाचे पत्रे मारून बांधकाम केले जात आहे; परंतु पत्र्याच्या या शेडच्या आतमध्ये सिमेंटच्या भिंती बांधून पक्के बांधकाम उभारले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती, तसेच १६ एप्रिल २०२४ या दिवशी झालेल्या मासिक सभेतही हा प्रश्न उपस्थित करून ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर बांधकामाची ग्रामपंचायत प्रशासनाने पहाणी केली असता हे बांधकाम अवैध असल्याचे लक्षात आले.

संपादकीय भूमिका

मशीद अवैध असतांनाही तिच्यावर आतापर्यंत कारवाई कशी झाली नाही ? आता तरी तिच्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवणार का ?