वैद्यकीय प्रवेश परिक्षेचे (नीट) गुण ३ वर्षे ग्राह्य धरण्याचा भारतीय वैद्यक परिषदेचा निर्णय

विदेशातील संस्थांमधील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) देणे बंधनकारक असून या परिक्षेचे गुण ३ वर्षे ग्राह्य धरण्याचा निर्णय भारतीय वैद्यक परिषदेने घेतला आहे. आतापर्यंत नीटचे गुण १ वर्षासाठीच ग्राह्य धरण्यात येत होते.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

मंगेशकर फाऊंडेशनने काही वर्षांपूर्वी सरकारकडून ९९ एकर भूमी केवळ १ रुपये किंमत मोजून लीजवर घेतली होती. त्या भूमीवर उभ्या रहाणार्‍या रुग्णालयामध्ये न्यूनतम दरात वैद्यकीय सुविधा देण्याचा करार करण्यात आला होता.

मंत्रालयात अभ्यागतांसाठी चिकित्सालय चालू करणार

विविध शासकीय कामकाजासाठी राज्यभरातून अभ्यागत मंत्रालयात येतात. त्यांना मंत्रालयात आपत्कालीन वैद्यकीय साहाय्य कधीही लागू शकते, यासाठी येथे चिकित्सालय चालू करण्यात आले आहे.

मोठ्या आवाजात ढोल वाजवणार्‍या युवतींचे मातृत्व भविष्यात धोक्यात !

परंपरेने स्त्री-पुरुषांमध्ये कामांची विभागणी ही त्यांच्या नैसर्गिक शरीररचनेच्या दृष्टीने केलेली असते, हे शास्त्र लक्षात न घेता स्त्री-पुरुष समानतेच्या खोट्या अभिनिवेशापोटी सध्या युवतींनी मोठे ढोल वाजवण्याची टूम (फॅशन) निघाली आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञानाने सिद्ध झाल्यावरच डोळे उघडणार का ?

राज्यात ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करण्याची हिंदु जनजागृती समितीची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

रुग्णांची होणारी लुटमार थांबवण्यासाठी, तसेच गरीब रुग्णांना परवडणारे आणि स्वस्तातील उपचार मिळावेत; म्हणून केंद्रशासनाने ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ संमत केला होता. तो लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला होता.

औषध विक्रीच्या माध्यमातून चाललेली लूट रोखा !

‘अन्न आणि औषध प्रशासना’कडे तक्रार करावी. डॉक्टरांनी दिलेल्या ३ गोळ्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’ची प्रत त्यासमवेत जोडावी; तसेच जर त्या दुकानदाराच्या दबावामुळे तुम्हाला ‘प्रिस्क्रिप्शन’हून अधिक गोळ्या घ्याव्या लागल्या, तर त्याच्या देयकाची प्रतही त्यासह जोडावी.’

नाशिक, जळगाव आणि धुळे येथील आधुनिक वैद्य अन् वैद्यकीय व्यावसायिक यांची १८० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त

आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे येथील आधुनिक वैद्य अन् वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांवर टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वैद्यकीय विद्यापिठांसाठी शुल्क नियमावली लागू !

वैद्यकीय विद्यापिठांचे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क प्रतिवर्षी २० ते २५ लाख रुपयांपर्यंत आकारले जाते. त्यामुळे आधुनिक वैद्य (एम्बीबीएस्) होण्यासाठी विद्यार्थ्यांला काही कोटी रुपये व्यय करावा लागतो. हे शुल्क नियमित करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ….

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना गरीब रुग्णांच्या राखीव खाटांची माहिती देणे बंधनकारक !

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमानुसार गरिबांवर विनामूल्य उपचार करण्यासाठी १० टक्के राखीव खाटा ठेवणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रातील अनेक धर्मादाय रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. महाराष्ट्रात अनुमाने ४३०, तर मुंबईत ७४ धर्मादाय रुग्णालये आहेत.

एम्आर्आय, सीटीस्कॅनसह ८ उपकरणांना औषधांचा दर्जा देणार !

सर्व प्रकारची प्रत्यारोपण उपकरणे, सिटी स्कॅन, एम्आर्आय, डिफ्रिबेलटर्स, डायलिसिस, पेट उपकरणे, क्ष-किरण आणि बोनमॅरो पेशी विलगीकरण अशा ८ उपकरणांना औषधांचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now