मुंबई, २० ऑगस्ट (वार्ता.) – माटुंगा येथील लक्ष्मीनारायण बाग सभागृहात १९ ऑगस्ट या दिवशी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या ठिकाणी ‘वॉल मॅग्झिन’ (भिंतीवर फलक सिद्ध करून त्यावर एखाद्या विषयावरील प्रतिक्रिया नोंदवणे. एखाद्या विषयाच्या प्रसाराचा हा अभिनव प्रकार आहे.) सिद्ध करण्यात आली होती. यावर वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयीचे अभिप्राय उत्स्फूर्तपणे नोंदवले.
‘भवसागरातील दीपस्तंभ’, ‘सनातन प्रभात साधकमित्र’, ‘सनातनचे हृदयस्पर्शी विचार घेऊन पुढील वाटचाल करू’, ‘वाचनीय वृत्तपत्र’, ‘आपले हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार करू शकेल, असे एकमेव वृत्तपत्र – ‘सनातन प्रभात’, ‘हे ‘सनातन प्रभात’ तुला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वाद लाभला आहे. निष्काम भावनेने सेवा करणार्या साधकांची जोड आहे’, ‘माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग – ‘सनातन प्रभात’ ‘घरोघरी ‘सनातन प्रभात’ असायला हवा’, ‘वृत्तपत्र नव्हे, सर्वांचा परममित्र’, ‘सनातन प्रभातमुळे मुलांवर धर्मसंस्कार, धर्माचरण यांचे संस्कार झाले’, ‘अतिशय छान’, ‘हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय’, ‘भक्त आणि भगवंत यांमधील दूत’ अशा शब्दांत वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी अभिप्राय नोंदवला.