महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ केल्यामुळे निलंबित केलेल्या भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला. या खटल्याची पुढील सुनावणी जानेवारी मासात होणार आहे.

पाट ते पिंगुळी रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सांमत यांच्या वाहनांचा ताफा अडवला

पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला अन् ‘येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाला प्रारंभ केला जाईल’, असे आश्‍वासन दिले.

‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात ‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

रंकाळा तलाव सुशोभिकरणासाठी संमत झालेले ९ कोटी ८४ लाख रुपये राज्यशासन देणार ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे हा संपूर्ण व्यय राज्यशासनाने करावा, अशी मागणी मी राज्यशासनाकडे केली होती – राजेश क्षीरसागर

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढणार्‍या रुग्ण संख्येमुळे पुन्हा निर्बंध लागू !

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ‘व्हेरिएंट’मुळे केंद्र सरकारने याविषयी देशातील सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणार्‍या प्रवाशांविषयी विशेष दक्षता घ्यावी, असे केंद्राने कळवले आहे.

बंदमधील हानीची रक्कम राजकीय पक्षांकडून वसूल करण्याची मागणी !

महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच महिलांवर अत्याचार करणारे आहेत ! – भाजपच्या नेत्या नीता केळकर

महाविकास आघाडी सरकारच्या २ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात महिला आणि युवती यांवर वाढलेल्या अत्याचारांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती केळकर बोलत होत्या.

एस्.टी.च्या संपातून आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची माघार !

न्यायालयात विलीनीकरणाचे सूत्र प्रलंबित आहे; म्हणून सारासार विचार केला. सरकारला नमते घ्यावे लागले. कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही, असे वचन सरकारने दिले. आमचा कर्मचार्‍यांवर दबाव नाही. तेही आम्हाला बांधील नाहीत.’’

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा

‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता !

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपद निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून राष्ट्रवादी काँग्रेस ९, काँग्रेस ५, तर शिवसेना ३ जागी विजयी झाली आहे. महाविकास आघाडीला एकूण १७ जागा मिळाल्या आहेत