जळगाव येथे बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांची पुनर्बांधणी होणार !

विभागीय कार्यालय पुनर्बांधणीसाठी १८ कोटी रुपये, जळगाव आगार नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ६ कोटी, तर विभागीय कार्यशाळा नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ८ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्‍ताव प्रशासकीय संमतीसाठी पाठवला आहे.

अवेळी पावसाने उन्‍हाळ्‍यातच बीड बसस्‍थानक बनले तळे !

मागील ३ दिवसांत पडलेल्‍या वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने येथील बसस्‍थानकाची अवस्‍था एखाद्या तळ्‍याप्रमाणे झाली आहे.

अस्वच्छ एस्.टी. स्थानकांविषयी ‘सुराज्य अभियाना’ची राज्य सरकारने घेतली नोंद !

‘सुराज्य अभियाना’च्या वतीने राज्य सरकारच्या ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना’चे स्वागत !

अत्‍यंत अस्‍वच्‍छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्‍था यांसह अनेक समस्‍या असलेले अक्‍कलकोट बसस्‍थानक !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकाचे काम अनेक वर्षे अपूर्ण असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांची असुविधा

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

एस्.टी.चा गलथानपणा !

बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्‍या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.

जळगाव, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारणार ! – पालकमंत्री

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाने मान्यता दिली आहे. यात पाचोरा २१, मुक्ताईनगर १७, चोपडा २१, तर इतर भागांसाठी ६२ बसगाड्या संमत झाल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

निवेदनातील मागण्या पूर्ण करण्यासाठी लवकरच उपाययोजना काढणार ! – नीलेश बेलसरे, विभागीय निरीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अमरावती विभाग

हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत याविषयी आगार व्यवस्थापक आणि विभागीय निरीक्षक यांना निवेदन देऊन याविषयी चर्चा करण्यात आली.

कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना देण्‍यात आले.

सोलापूर बसस्‍थानकातील अस्‍वच्‍छता दूर करून नागरिकांना आवश्‍यक सुविधा त्‍वरित पुरवाव्‍यात !

येथील बसस्‍थानकाच्‍या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, पिशव्‍या, चिखल आणि बसस्‍थानकावर उघड्यावर करण्‍यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्‍थानकावर अत्‍यंत अस्‍वच्‍छता असून दुर्गंधी पसरली आहे.