निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता !

नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन

कोल्हापूर, ६ मे (वार्ता.) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान होत आहे. त्यासाठी ६ मे २०२४ या दिवशी मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य, तसेच निवडणूक अधिकारी अाणि कर्मचारी यांना सोडण्यासाठी अन् ७ मे या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रांतून निवडणूक साहित्य, तसेच निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन कोल्हापूर विभागाच्या माध्यमातून मतदार संघनिहाय एकूण ४३५ बस पुरवण्यात आल्या आहेत.

राज्य परिवहन कोल्हापूर विभागाकडे ७४१ बस उपलब्ध असून त्यातील ४३५ बस निवडणूक कामकाजासाठी पुरवण्यात आल्यामुळे काही मार्गांवरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तरी प्रवासी जनतेने होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.