बुलढाणा येथे एस्.टी. आणि खासगी बसचा अपघात !

१ महिला ठार, तर २५ प्रवासी घायाळ

प्रतिकात्मक चित्र

बुलढाणा – जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत. या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते. घायाळांपैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘ओव्हरटेक’ (पुढील गाडीच्या पुढे जाण्यासाठी त्या गाडीच्या बाजूने स्वतःची गाडी जलद गतीने पुढे नेणे) करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे. खासगी बसने एस्.टी. बसला मागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांची मोठी हानी झाली आहे.