जालन्‍यातील आंदोलनामुळे एस्.टी. महामंडळाचे ४६ आगार पूर्णत: बंद !

आंदोलनाच्‍या वेळी सर्वसामान्‍यांची प्रवासात होणारी आणि अन्‍य गैरसोय टाळण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना काढाव्‍यात !

‘लाल परी’ची दु:स्थिती !

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या एका बसची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे. या चित्रफीतीत पाऊस चालू असतांना चालक एका हातात छत्री आणि दुसर्‍या हातात बसचे ‘स्टेअरिंग’ घेत बस चालवत असल्याचे दिसते.

‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला ‘शिवाई’पासून ७ दिवसांत ६ लाखांचे उत्पन्न !

राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत.

#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

#Exclusive : ५ वर्षांत तिकिटात सवलत दिलेल्या प्रवाशांची नोंद न ठेवल्याने एस्.टी. महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड !

‘तिकिट यंत्रांमधील तांत्रिक बिघाड कि एस्.टी. महामंडळातील घोटाळा ?’, याविषयी सखोल चौकशी व्हायला हवी !

रत्नागिरी एस्.टी. बसस्थानकाचे ६ वर्षे काम रखडल्याने मनसेने मोर्चा काढून दिली चेतावणी !

आमदार, खासदार नव्हे, तर मंत्री आपले आहेत. मागील ६ वर्षांमध्ये आमदार पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा एस्.टी. बसस्थानकाचा विषय निधीअभावी रखडतो, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.

हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम : सुराज्य अभियान !

आम्ही राबवत असलेल्या किंवा आपल्याला लक्षात आलेल्या काही नवीन मोहिमा आपण निश्चितपणे राबवू शकता. याविषयी कुणाला काही शंका किंवा कशा प्रकारे उपक्रम राबवायला हवेत ? याविषयी माहितीसाठी आम्हाला अवश्य संपर्क करा.

गणेशभक्तांच्या परतीसाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन : २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण

गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांना परत जाण्यासाठी रत्नागिरी विभागातून १ सहस्र ५५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून २७९ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) बसस्थानकाच्या दुरवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

बसस्थानकाची एवढी दुरवस्था झाल्याचे एस्.टी. महामंडळाला अन्य कुणीतरी का दाखवून द्यावे लागते ? महामंडळ काय करत आहे ?

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बसस्‍थानक सुशोभिकरणाचा प्रस्‍ताव अंतिम टप्‍प्‍यात

‘एस्.टी. बसस्‍थानक दत्तक योजना’ घोषित केली आहे. या अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २४ बसस्‍थानकांचे सुशोभिकरण करण्‍यात येणार आहे. यांसाठी उद्योजक, व्‍यापारी संस्‍था यांच्‍याकडे सूचना मागवण्‍यात आल्‍या आहेत.