पुणे येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी आता आरामदायी ‘जन-शिवनेरी’ बस !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २३ बसस्‍थानके ‘श्री गणेश बेकरी नांदणी’ यांच्‍याकडून सुशोभिकरणासाठी घेण्‍यात आली आहेत.

मेगाब्‍लॉकच्‍या काळात एन्.एम्.एम्.टी. बससेवेमुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा !

बेलापूर-पनवेल जंबो मेगाब्‍लॉकच्‍या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्‍या (‘एन्.एम्.एम्.टी.’च्‍या) माध्‍यमातून विशेष बस सेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. यामुळे लोकलच्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर उपक्रमाकडून २८ बस उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

कोकणातील गणेशोत्‍सवासाठी ९१७ बस पाठवल्‍याने मराठवाड्यातील प्रवाशांचे हाल !

राज्‍य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडल्‍या आहेत. त्‍यामुळे मराठवाड्यातील लांब पल्‍ल्‍याच्‍या आणि जिल्‍हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्‍सवाच्‍या पहिल्‍या दिवशी अनेकांची गैरसोय झाली आहे. 

इलेक्‍ट्रिक एस्.टी. गाड्या खरेदीसाठी राज्‍यशासन २५ कोटी रुपये देणार !

‘महाराष्‍ट्र इलेक्‍ट्रिक धोरण-२०२१’ च्‍या अंतर्गत बसगाड्यांच्‍या खरेदीसाठी महाराष्‍ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्‍यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्‍या परिवहन विभागाचे अभिनंदन !

एस्.टी. अस्‍वच्‍छ असल्‍यास आगार व्‍यवस्‍थापकांना होणार ५०० रुपयांचा दंड !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ, सुंदर बसस्‍थानक अभियान’ चालू करूनही एस्.टी.च्‍या गाड्यांमध्‍ये म्‍हणावी तशी स्‍वच्‍छता नसल्‍यामुळे एस्.टी. महामंडळाने याविषयी कडक धोरण अवलंबले आहे.

एस्.टी.चा विकास रोखणारे ‘गतीरोधक’ !

एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

एस्.टी.त तिकीटाचे पैसे आता ‘ऑनलाईन’ देता येणार !

एस्.टी.च्या बसगाड्यांमध्ये तिकीट देण्यासाठी ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’चा वापर केला जाणार आहे. येत्या दीड मासात राज्यातील १०० टक्के एस्.टी. गाड्यांमध्ये ‘अ‍ॅन्ड्रॉइड मशीन’ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवात भाविकांसाठी आतापर्यंत २ सहस्र ७०० एस्.टी. गाड्या आरक्षित !

मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे.

पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित !

जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्‍या लाठीमाराचे पडसाद महाराष्‍ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसगाड्या पेटवण्‍यात, तसेच फोडण्‍यात आल्‍या आहेत.