रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठीच्या अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् वितरण यांचे दायित्व राज्यांवर सोपवावे !

रेमडेसिविर आणि इतर औषधे, तसेच कोरोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी अन् त्यांचे वितरण यांचे दायित्व राज्यांकडे द्यावे. साथरोगाविषयीचे व्यवस्थापन फार काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

श्री मलंगगडावर आरतीसाठी निघालेले मनसेचे नेते अविनाश जाधव पोलिसांकडून कह्यात !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !

सिलिका वाळूच्या अवैध उत्खननाविषयी हरित लवाद अथवा उच्च न्यायालयात दाद मागणार ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे

प्रांताधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना हाताशी धरून ते संगनमताने शासकीय महसुलाची हानी करत आहेत.

पुणे येथील उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने काळे फासले

हिंदीतून सुविचार लिहिण्याच्या सूचना देणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर याविषयी कारवाई करण्याचे आश्‍वासनही कक्ष अधिकार्‍यांनी दिले आहे.

मनसेचा वर्धापनदिन सोहळा रहित

कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च या दिवशी होणारा वर्धापनदिन सोहळा रहित केला, असे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.

मुंबईतील कराची बेकरीची शाखा बंद !

७४ वर्षे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे नाव देऊन आणि दुकानांच्या अनेक शाखा निर्माण करून मुसलमान पैसे कमावू शकतात, असे केवळ भारतातच होऊ शकते !

खासदार उदयनराजे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.

वाशी येथे मनसेच्या वतीने ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ अभियान

मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले-देशमुख आणि वाशी विभागाचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. या प्रसंगी महाराष्ट्र सैनिक आणि मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.