मुंबई – कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च या दिवशी होणारा वर्धापनदिन सोहळा रहित केला, असे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटले. राज ठाकरे हे वर्धापनदिनापूर्वी अयोध्या दौर्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती; मात्र शेतकरी आंदोलनामुळे अद्याप या दौर्याचे नियोजन झाले नाही, असेही नितीन सरदेसाई यांनी सांगितले.