पुण्यात अ‍ॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक

कोंढवा बुद्रुक परिसरातील अ‍ॅमेझॉनच्या गोदामात ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’ अशा घोषणा देत तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ८ कार्यकर्त्यांना कोंढवा पोलिसांनी २८ डिसेंबर या दिवशी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागरिकांना नववर्षांचे स्वागत करायला द्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती !

‘वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता १ दिवस आमचे ऐका. नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या’, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.

‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांची क्षमायाचना ! – अखिल चित्रे, मनसे

‘अ‍ॅमेझॉन’ने त्यांच्या सर्व ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर मराठी भाषेचा समावेश करण्याच्या आश्वासनासह ‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांच्याकडे क्षमायाचना करण्यात आली, अशी माहिती मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.   

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयांची तोडफोड

‘अ‍ॅप’मध्ये मराठीचा उपयोग करण्यावरून आडमुठेपणा करणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’च्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘ॲमेझॉन’च्या कामात अडथळा न आणण्याचे न्यायालयाचे मनसेला निर्देश

‘ॲमेझॉन’ आस्थापन आणि त्यांचे कर्मचारी यांना त्यांचे काम करण्यापासून कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये,=दिंडोशी दिवाणी न्यायालय

राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस

अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अ‍ॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली

शिवसेनेने प्रजासत्ताकदिनापर्यंत औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरण करावे ! – सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

केवळ औरंगाबादच नव्हे, तर उस्मानाबाद, इस्लामपूर यांची नावे पालटून ती संभाजीनगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा !

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.