श्री मलंगगडावर आरतीसाठी निघालेले मनसेचे नेते अविनाश जाधव पोलिसांकडून कह्यात !

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हिंदूंना कह्यात घेतात आणि धर्मांधांना मात्र कोणतेही कृत्य करण्याची मोकळीक देतात, हा दुटप्पीपणाच होय !

ठाणे, ३१ मार्च (वार्ता.) – कल्याण येथील श्री मलंगगडावर विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते करत असलेली आरती धर्मांधांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा देत रोखली होती. त्या वेळी मध्यस्थी करणार्‍या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करून ४ जणांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी श्री मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवले आणि नेवाळी पोलीस चौकीत आणले. या वेळी अविनाश जाधव यांच्या समवेत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतरही २७ एप्रिलला चैत्र पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्धार अविनाश जाधव यांनी फेसबूकद्वारे व्यक्त केला आहे.