बृजभूषण सिंह यांची हकालपट्टी करावी ! – प्रकाश महाजन, नेते, मनसे

राज ठाकरे यांना ‘उत्तर भारतियांची क्षमा मागा मगच अयोध्येत पाय ठेवा’ अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. बृजभूषण हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे येथे आले होते. तेव्हा मनसेने विरोध केला नव्हता. आता मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा घालावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही !

फवाद खान याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली चालू आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय आस्थापनांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घातल्या आहेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालून सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये !

सीमावादाचा प्रश्‍न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा; पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल, तर आमचेही उत्तर तितकेच तीव्र असेल, हे विसरू नका.

हिंदूंना ‘झटका’ मांसाचा पर्याय न देणार्‍या मुंबईतील ‘मटण शॉप’ ला मनसेकडून ९० दिवसांची समयमर्यादा !

हिंदूंना झटका मांसाचा पर्याय न ठेवणार्‍या अंधेरी (पश्चिम) येथील टाटा ग्रुपच्या स्टार बाजार मॉलमधील ‘फ्रेश चॉईस’ या दुकानात ‘झटका’ मांस ठेवण्यासाठी मनसेकडून तंबी देण्यात आली.

मनसे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार ! – राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे चालू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘‘धोरण म्हणून काही गोष्ट असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’. ५० वर्षे कारागृहात सडत रहाण्यापेक्षा कृष्णनीतीने कारागृहाच्या बाहेर पडणे हे कधीही चांगले. महापुरुषांवर अशी टीका करणे आता बंद करा.

(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काँग्रेसच्या विरोधात काम करायचे !’

राहुल गांधी यांच्या या विद्वेषी विधानावरून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा आहे कि ‘भारत तोडो’ यात्रा आहे ? हे कुणीही सांगेल ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशा यात्रांवर सरकारने तात्काळ बंदी घातली पाहिजे !

धाराशिव येथे मनसेच्या चेतावणीनंतर रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

प्रत्येक वेळी राजकीय पक्षांना चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत:ची कामे का करत नाही ?

धाराशिव शहरातील खड्डे लवकर बुजवा अन्यथा तोंडाला काळे फासू !

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रतिदिन अपघात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिली आहे.