हिंदूंना हलाल मांस विकणार्‍या अंधेरी (मुंबई) येथील चिकन दुकानाच्या मालकाला मनसेकडून तंबी !

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार न करणार्‍या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्यास न्यायालयात जाणार !

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याने मनसेच्या विधी विभागाने येथील ४ मल्टिप्लेक्सला कायदेशीर नोटीस बजावली. ‘प्रदर्शन थांबवल्यास मल्टिप्लेक्सच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करू’, अशी चेतावणी मनसेने दिली.

संभाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी मनसेच्या वतीने आंदोलन !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी येथील  शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी संमत करून भुयारी मार्ग सिद्ध करून द्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.

ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने, तर पुणे येथे संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला !

ज्या जितेंद्र आव्हाड यांनी आगामी ‘वेडात मराठे दौडले सात’ या चित्रपटात ‘उंच अभिनेते अक्षयकुमार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेशी जुळून येत नाहीत’, असे म्हटले, त्यांनी अक्षय कुमार यांच्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटातील भूमिकेला का विरोध केला नाही ?

मराठीतून निवेदन करण्यासाठी ‘स्टार स्पोर्ट्स’ला मनसेकडून चेतावणी !

महाराष्ट्रात प्रक्षेपण करून कोट्यवधी रुपये कमवायचे; मात्र मराठीला प्राधान्य देण्यासाठी चालढकल करायची, असा उद्दामपणा करणार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे !

मनसे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार !

महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘आदिपुरुष’ चित्रपटाला मनसेचा पाठिंबा !

कलेत अभिव्यक्तीस्वातंत्र्य असू शकते; परंतु देवतांच्या कथा आणि नावे वापरून चित्र-विचित्र पोशाख आणि वेश अन् केशभूषा केलेली व्यक्तीमत्व दाखवणे, हे अयोग्य आहे !

संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण

राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा ? – राज ठाकरे, प्रमुख, मनसे

राज ठाकरे यांनी सांगितले, ‘‘नागपूर येथील मनसेची सर्व पदे विसर्जित करण्यात आली आहेत. घटस्थापनेनंतर लवकरच नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल.”

नाशिक येथील भोंगे ७ दिवसांत हटवा, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू !

मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, सणासुदीच्या काळात कर्णकर्कश भोंगे वाजवले गेले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडे त्याविरोधात तक्रार केली असून नोंद न घेतल्यास ७ दिवसानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल.