बृजभूषण सिंह यांची हकालपट्टी करावी ! – प्रकाश महाजन, नेते, मनसे

प्रकाश महाजन

संभाजीनगर – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे बृजभूषण सिंह यांची हकालपट्टी करून त्यांचे त्यागपत्र घेतले पाहिजे, अशी मागणी येथील मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.

 (सौजन्य : ABP MAJHA)

गेल्या वर्षी अयोध्या दौर्‍यासाठी निघालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बृजभूषण सिंह यांनी रोखले होते. ‘उत्तर भारतियांची क्षमा मागा मगच अयोध्येत पाय ठेवा’ अशी आक्रमक भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. त्यानंतर बृजभूषण हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे येथे आले होते. त्या वेळी मात्र मनसेने विरोध केला नव्हता. आता मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.