राज्यात ८ सहस्र ८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव ! – अदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री

महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे

मुंबई, ८ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्रात ८ सहस्र ८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव केंद्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत. याविषयी केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री अन्नपूर्णादेवी यांची मी भेट घेतली आहे. प्रस्तावित अंगणवाड्यांसाठी त्या सकारात्मक आहेत, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. ‘आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी कधीपर्यंत करण्यात येणार ?’, असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता.