‘अनिल देशमुख असेच मधे बोलत असल्याने ते ‘आत’ जात आहेत !’

सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाला सत्ताधार्‍यांचा आक्षेप, सत्ताधारी आमदार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी !

मराठा आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याविषयीचा ठराव विधानसभा आणि विधान परिषद येथे संमत !

मराठा समाजाला ‘एस्.ई.बी.सी.’तून आरक्षण देण्याविषयीचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यघटनेत यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याविषयीचा ठराव विधानसभा आणि विधान परिषद येथे संमत केला आहे.

विरोधकांचे सदस्य अल्प करण्यासाठीच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

काही मंत्री सभागृह चालू नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी सिद्ध करत आहेत. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, तसेच त्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. विरोधकांनी काहीही केले, तरी त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत आणि त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत.

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ, प्रश्नोत्तराची संधी नसल्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता

सध्या राज्यापुढे असलेले कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली शेतकर्‍यांची हानी आदी महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी अधिवेशनात वेळ देण्यात आलेला नाही.

‘ईडी’ची कारवाई, मराठा आणि ओबीसी आरक्षण, विधान परिषदेत १२ आमदारांच्या नियुक्तीवरून गदारोळ होण्याची शक्यता !

राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड टळणार !

सभागृहात संधी दिली नाही, तर जनतेमध्ये जाऊन प्रश्न मांडू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

५ जुलैपासून चालू होत असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली.

प्रश्‍नोत्तरे, तारांकित आणि लक्षवेधी यांना बगल देऊन विधीमंडळाचे अधिवेशन केवळ २ दिवसांचे होणार !

१५ दिवसांच्या अधिवेशनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने कामकाज समितीच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार !

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी विधीमंडळ समिती घोषित

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधीमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले !

गेल्या १ मार्चपासून चालू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे १० मार्च या दिवशी सूप वाजले. पुढील अधिवेशन ५ जुलै या दिवशी मुंबई येथे घेण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घोषित केले.

वाझे यांचे गुन्हे शाखेतून स्थानांतर करणार ! – गृहमंत्री

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळामुळे जनतेच्या पैशांतून चालणार्‍या सभागृहाचा वेळ वाया घालवणे कितपत योग्य ? अशांकडून जनहितार्थ कार्याची अपेक्षा कशी करता येईल ?