नाशिक येथील गावठाणातील मिळकतीवर अनधिकृत इमारतीचे बांधकाम केल्याचे प्रकरण
मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – नाशिक यथील मुशीर मुनिरोद्दीन सय्यद यांनी गावठाणमध्ये येणार्या मिळकतीवर नाशिक महापालिकेची दिशाभूल करून अनधिकृतपणे इमारतीचे बांधकाम करून तिचा वापर केला असेल, तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करून येत्या १५ दिवसांत चौकशी करण्यात येईल. सय्यद आणि कार्यकारी अभियंता यांनी महापालिका आयुक्तांचे अधिकार वापरून इमारतीच्या बांधकामाला अनुमती दिल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना दिले. भाजपचे आमदार नितेश राणे ही लक्षवेधी मांडली होती.
आमदार नितेश राणे म्हणाले की,…
१. विकास आराखड्यात ६३७०.९० चौ.मी. क्षेत्र हे मुसलमान कब्रस्तान म्हणून दर्शवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या सभेत ठराव करून या जागेला स्मशानभूमीऐवजी रहिवासी क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रकरणी नगररचना विभागाकडून कार्यवाही झालेली नाही.
३. रहिवासाची अनुमती असतांना ‘लॉजिंग-बोर्डिंग’चा व्यवसाय करून जागेचा व्यवसायासाठी वापर करण्यात आला आहे.