पुणे लोकसभा पोटनिवडणूक रहित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर खासदारपदाची जागा रिकामी होती. ६ मासांमध्ये निवडणूक घेणे आवश्यक होते; परंतु ती घेतली नव्हती. या संदर्भामध्ये गेल्या मासामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘पोटनिवडणूक घ्या’, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता; परंतु पोटनिवडणूक घेण्याच्या या निर्णयाला ८ जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. ‘सार्वत्रिक निवडणुकीला आता थोडाच वेळ शेष आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक नको’, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.

या संदर्भात पुणे येथील सुघोष जोशी यांनी अधिवक्ता कुशल मोरे, श्रद्धा स्वरूप आणि दयाल सिंघला यांच्या माध्यमातून याचिका प्रविष्ट केली होती.