२३.५.२०१९ या दिवशी भारतातील लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होण्याच्या संदर्भात मयन महर्षींनी दिलेला संदेश !

‘२३.५.२०१९ या दिवशी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहेत. १. २३.५.२०१९ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व अ. २३.५.२०१९ या दिवशी मकर रास आणि उत्तराषाढा नक्षत्र आहे. कलियुगातील या चरणामध्ये धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतलेले श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्म मकर राशीत आणि उत्तराषाढा नक्षत्रात झाला आहे. आ. २३.५.२०१९ या दिवशी गुरुवार आहे. … Read more

माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल ! – साध्वी प्रज्ञासिंह

असे विधान किती विजयी उमेदवार करतात ? हिंदूंना आतंकवादी ठरवणारे दिग्विजय सिंह यांचा साध्वी यांनी केलेला पराभव, म्हणजेच हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला ४१ जागांवर आघाडी

महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी भाजप २३, तर शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगड मतदार संघात पराभव झाला असून ….

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचा दणदणीत विजय !

देशभरात ७ टप्प्यांमध्ये झालेल्या १७ व्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने ४८ पैकी २३ जागा जिंकल्या आहेत, तसेच शिवसेना १८ जागांसह राज्यातील दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेसला फक्त १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दुष्काळग्रस्त स्थितीतही भाजप-शिवसेना यांनी केलेल्या प्रामाणिक कामांमुळे जनतेने महायुतीला कौल दिला ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी राज्यातील आणि देशातील जनतेचे आभार मानतो. देशातील आणि राज्यातील मध्यमवर्गीय अन् गरीब जनता मोदी यांना निवडून देण्यासाठी उत्सुक होती.  या निवडणुकीत देशाच्या इतिहासात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले आहे.

नरेंद्र मोदी यांच्यापुढे २५ वर्षे कोणी टिकणार नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

आजच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले, तर देश मोदीमय झाल्याचे दिसत आहे. देशाचा कौल विरोधकांनी स्वीकारला पाहिजे. मोदी यांच्यासमोर कोणी टिकू शकले नाही, हे सत्य आहे. पुढील २५ वर्षे कोणीच त्यांच्यापुढे उभे राहू शकत नाही,….

युती कायम राहील, राष्ट्रहितासाठी एकत्रित काम करू ! – उद्धव ठाकरे

आम्ही पराभवाने खचून गेलेलो नाही आणि विजयाचा उन्माद नाही. जनतेच्या आशीर्वादामुळे आम्ही विजयी झालो. आम्ही चुकलो, तर प्रसिद्धीमाध्यमांना आमचे कान धरण्याचा अधिकार आहे; मात्र विरोधासाठी विरोध करू नका.

जनतेला दूरचित्रवाणीवर काम करणार्‍या अभिनेत्यांपेक्षा रस्त्यावर काम करणारे नेते हवेत ! – गोपाळ शेट्टी

मतदारांना ‘फिल्मस्टार’ नाही तर, ‘रोडस्टार’ हवे आहेत. त्यामुळेच मतदारांनी मला संधी दिली. आता आधीपेक्षा पुन्हा अधिक जोमाने विकासकामे होणार आहेत.

भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आघाडीला देशात काही राज्यांत यश मिळेल, अशी आशा होती; मात्र यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली आहे. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

निकालामध्ये हेराफेरी दिसते ! – नारायण राणे

परिस्थिती अशीच राहिली, तर निवडणुका लढवायच्या कि नाही, असा विचार करावा लागेल. लोकांनी बहुमत देऊनही निकाल विरोधात लागतो, तर अशी निवडणूक कशाला हवी ? या निकालामध्ये हेराफेरी दिसते, ….


Multi Language |Offline reading | PDF