नाशिक येथील महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढणार !

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज

नाशिक – ‘जय बाबाजी भक्त परिवारा’च्या वतीने महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार आहेत’, अशी माहिती ‘जय बाबाजी परिवारा’चे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी २९ जानेवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नाशिक मतदारसंघात ‘जय बाबाजी भक्त परिवारा’ची २ लाखांहून अधिक संख्या आहे.

वर्ष २००९ च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून स्वामी शांतीगिरी महाराजांनी ‘अपक्ष’ निवडणूक लढवली होती. त्या वेळी १ लाख ४८ सहस्र २६ (२०.२५ टक्के) मते घेऊन महाराज तिसर्‍या क्रमांकावर राहिले होते. विजयी उमेदवार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना २ लाख ५५ सहस्र ८९६ मते (३५ टक्के) मिळाली होती. वर्ष २०१४ मध्येही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते; परंतु शिवसेना-भाजप नेते आणि मतदार यांनी मनधरणी करून त्यांना निर्णय पालटण्यास भाग पाडले होते.