रत्नागिरी : मालगुंड येथे मराठी लोककलेवर आधारित कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटला, तरी मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पहावी लागते, हे दुर्दैव !

‘आज भारतात सर्वत्र मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक असल्याने ती केवळ एका राज्याची भाषा राहिली नसून राष्ट्रीय भाषा झाली आहे.’

मराठी भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवणे आवश्यक !

इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे.

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक !

भारतीय परराष्ट्र सेवा या क्षेत्रांत आज १० टक्केही मराठी माणसे नाहीत. हे चित्र पालटायचे, तर माय मराठी मातीची कास धरावी लागेल. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करावा लागेल. तळागाळाचा विकास हे मुख्य ध्येय ठरवावे लागेल.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

मराठी ज्ञानभाषा कधी होणार ?

मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्‍याचे परिवर्तन घडवून आणणे हे सरकार, मराठीजन, मराठी वापरकर्ते आणि तिच्‍यावर प्रेम करणारे या सर्वांचेच दायित्‍व आहे !

मराठी भाषेच्‍या समृद्धीसाठी राज्‍य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठी साहित्‍यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्‍य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्‍यिकांच्‍या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.

‘मराठी’चा जागर अपेक्षित !

संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

महाराष्ट्राच्या शासकीय कामकाजात आढळले ७ सहस्रांहून अधिक किचकट आणि परकीय शब्द !

सरकारने हे परकीय शब्द हटवून त्याजागी स्वकीय शब्दांचा वापर करून भाषाशुद्धीच्या कार्याची परंपरा जोपासावी !

‘मराठी’ लोप पावलेली साहित्‍य संमेलने !

ज्‍या संमेलनांमध्‍ये श्री सरस्‍वतीदेवीलाच नाकारले जात असेल, तेथे मराठीच्‍या उत्‍कर्षाची अपेक्षा काय ठेवणार ? तसे मंथन या संमेलनातून घडण्‍यासाठी सारस्‍वतांना श्री गणेश आणि श्री सरस्‍वतीदेवी सद़्‍बुद्धी देवो, हीच प्रार्थना !