नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नामाचे लिंग ठरवण्याच्या पद्धती’, तसेच ‘लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट’ या विषयाच्या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.

प्रा. वेलिंगकर यांच्या मातृभाषा आंदोलनावरील ‘लोटांगण’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन

हितचिंतकानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून गोव्यातील एका ज्वलंत चळवळीवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘लोटांगण’च्या विमोचन कार्यक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाशक श्रीविद्या प्रतिष्ठान आणि लेखक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

गोवा : सरकारची प्रोत्साहनपर योजना बंद होऊनही मातृभाषेतील शाळांसाठी अर्ज येणे चालूच !

राज्यात वर्ष २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षासाठी मराठीतून पहिली इयत्ता चालू करण्यासाठी १०, तर कोकणीतून पहिली इयत्ता चालू करण्यासाठी २१ अर्ज शिक्षण खात्याकडे आलेले आहेत.

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन तसेच ‘मराठी भाषा संवर्धनासाठी लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

रत्नागिरी : मालगुंड येथे मराठी लोककलेवर आधारित कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटला, तरी मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पहावी लागते, हे दुर्दैव !

‘आज भारतात सर्वत्र मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक असल्याने ती केवळ एका राज्याची भाषा राहिली नसून राष्ट्रीय भाषा झाली आहे.’

मराठी भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवणे आवश्यक !

इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे.

शालेय शिक्षण मातृभाषेतूनच होणे आवश्यक !

भारतीय परराष्ट्र सेवा या क्षेत्रांत आज १० टक्केही मराठी माणसे नाहीत. हे चित्र पालटायचे, तर माय मराठी मातीची कास धरावी लागेल. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट करावा लागेल. तळागाळाचा विकास हे मुख्य ध्येय ठरवावे लागेल.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

मराठी ज्ञानभाषा कधी होणार ?

मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्‍याचे परिवर्तन घडवून आणणे हे सरकार, मराठीजन, मराठी वापरकर्ते आणि तिच्‍यावर प्रेम करणारे या सर्वांचेच दायित्‍व आहे !