गोवा : सरकारी संकेतस्थळांवर राजभाषा अद्याप उपेक्षित

सरकारी खाती आणि संस्था यांची १०५ संकेतस्थळे इंग्रजीतून चालतात !

पणजी, ३० जुलै (वार्ता.) – राज्य सरकारची २६ खाती आणि ७९ संस्था यांची संकेतस्थळे इंग्रजी भाषेतून चालतात. गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध केलेला नाही. या संकेतस्थळावर कोकणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

राज्य सरकारने माहिती आणि प्रसिद्धी खाते, कौशल्य विकास, अन्न आणि औषध प्रशासन, वस्तूसंग्रहालय, आदिवासी कल्याण, कारखाने आणि बाष्पक, वाहतूक, मत्स्योद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, लेखा, नागरी विमनोड्डाण, पर्यावरण, पर्यटन पुरातत्व, अक्षय्य ऊर्जा आदी २६ सरकारी खात्यांची संकेतस्थळे केवळ इंग्रजी भाषेतून चालू आहेत. इतर खात्यांच्या संकेतस्थळांवर गोव्याची राजभाषा कोकणीचा पर्याय देण्यात आलेला आहे.