१ मे २०२३ या दिवशी ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्या निमित्ताने…

१. मराठीच्या उदासीनतेविषयी महाराष्ट्राच्या दोन्ही राजधान्यांची दुर्दशा !
१ अ. मुंबई : येथे दूध विकणारे उत्तर भारतीय लोक शेकडो वर्षांपासून मुंबईत रहात आहेत. ते हिंदीतूनच बोलतात आणि मुंबईकर मराठी त्यांच्याशी मोडक्या-तोडक्या हिंदीतून बोलतात.
१ आ. नागपूर : येथे मी पाहिले, कित्येक मराठी भाषिक हिंदीतून बोलतात; पण पिढ्यान्पिढ्या राहिलेले अमराठी मराठीतून बोलणार नाहीत. बंगाली मिठाईवाला मराठीतून बोलणार नाही. नागपूरमधून निवडून आलेले हिंदी भाषिक खासदार अन् आमदार मराठीतून बोलत नाहीत.
२. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही !
मराठी लोकांमध्ये स्वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्ट्राकडेच जातो. महाराष्ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्ट्रीय लोकांनी स्वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्य घटना आहे.
३. स्वभाषेचे लाभ
स्वभाषेने संस्कृती, शिक्षण, बौद्धिक श्रेणी आणि सर्वसामान्य ज्ञान वाढते, तसेच चौकसपणा येतो, साहित्याची वृद्धी होते, हे लाभ काय आम्हास ठाऊक नाहीत ?
– प्रा. ना.ल. वैद्य
(साभार : स्मरणिका, बृहन्महाराष्ट्र महामंडळाचे ४५ वे अ.भा. अधिवेशन ग्वाल्हेर (१२ आणि १३ मे १९९०))
संपादकीय भूमिकासर्वाधिक प्राचीन भाषा असलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा अद्यापही न मिळणे, हे मराठीजनांना लज्जास्पद ! |
हे वाचा –

♦ महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती
https://www.sanatan.org/mr/a/9461.html
‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !