कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.
आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना डॉ. विजय जंगम स्वामी म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.
कोल्हापूर-तिरुपती मार्गावर ३ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा चालू करण्यात येणार आहे. याच्या तिकिटाची नोंदणी ४ दिवसांत चालू होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे.
शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा १६ जानेवारीला प्रारंभ करण्यात आला. सांगली जिल्ह्यात ९ लसीकरण केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्षे गावात निवडणूक झालेली नाही. यंदा ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी निवडणूक झाली. यामुळे बिनविरोध परंपरा मोडीत निघणार म्हणून गावातील एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.
रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.