कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा १६ जानेवारीला प्रारंभ करण्यात आला. रुग्णालयातील कर्मचारी अक्षता विक्रम माने यांना पहिल्यांदा लस देण्यात आली. इचलकरंजी येथे आय.जी.एम्. रुग्णालयात भेट देऊन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी लसीकरणाविषयी पहाणी केली. या वेळी शिवसेना खासदार श्री. धैर्यशील माने उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात ९ लसीकरण केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यात ३१ सहस्र ८०० डोस प्राप्त झाले आहेत. सांगली येथे भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्यभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता, आरोग्य अधिकारी, परिचारिका, नगरसेवक यांसह अन्य उपस्थित होते.