दैनिक ‘केसरी’च्‍या पिंपरी कार्यालयाचे प्रमुख ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराने निधन !

पत्रकारितेतील अनुभवी व्‍यक्‍तिमत्त्व म्‍हणून ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले यांच्याकडे पाहिले जायचे. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्‍यांच्‍या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्‍का बसला आहे.

सर्वोच्च नेत्याचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्यावरून इराणच्या सैन्य प्रमुखाकडून ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाच्या संपादकांना धमकी !

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर अशा प्रकारे घाला घालणार्‍यांच्या विरोधात भारतातील पुरो(अधो)गामी कधी बोलतील का ?

व्यावसायिकतेच्या हव्यासापोटी सध्याची भरकटलेली पत्रकारिता !

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.

नवी मुंबई महापालिकेकडून वाशीतील महिला सुलभ शौचालयाची स्वच्छता !

कंत्राटदारांनी स्वच्छतेचे काम केले आहे कि नाही, हे न पहाणारे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि अधिकारी  यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !

एन्.डी.टी.व्ही.’चे प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचे प्रवर्तक पदाचे त्यागपत्र

‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक आस्थापन ‘आर्.आर्.पी.आर्. होल्डिंग्ज’च्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचे त्यागपत्र दिले. अदानी समूहाला आस्थापनाच्या मालकीचा काही भाग विकला आहे.

संवेदनशील पत्रकाराच्या मर्यादा अर्थात् दुःख आणि साहित्यिकांची स्थिती !

‘संवेदनशील पत्रकाराचे म्हणून एक वेगळे आणि फार खोल आशय असलेले दुःख असते. दैनंदिन धबडग्यात अनेक घटना आणि माणसे यांचा न्याय करण्याची कामगिरी त्यांच्यावर येऊन पडते; पण तो न्याय देऊ शकतोच, असे नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात कारवाई करा !

शेती करण्याच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यातील (मुख्यत्वे केरळातील) व्यावसायिक अमली पदार्थांची शेती करत आहेत. यामुळे जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा वाढला आहे, असे पोलीस आधिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

कुंकवाच्या आडून !

जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गोवा पुरातत्व खात्याने अडीच वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी केले होते दुर्लक्ष !

संबंधित पोलिसांचे भूमी माफियांशी संबंध होते का ? हे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! जनतेनेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन घोटाळेबाजांवर आणि त्यांना साहाय्य करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत !

‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर अमरावती येथे गुन्हा नोंद !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे’, असे कुठलेही वाक्य म्हटलेले नव्हते.न बोललेले त्यांच्या तोंडी हेतूपुरस्सर घालण्यात आले आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली.