वारीशे यांच्या घातपाताविषयी सखोल चौकशी करण्याविषयी आमदार डॉ. राजन साळवी यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूचे प्रकरण

पत्रकार शशिकांत वारीशे – अपघात की हत्या ?

मुंबई – सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या घातपाताबाबत सखोल चौकशी करण्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य देण्याविषयी लक्षवेधी सूचना मांडली.

आमदार डॉ. राजन साळवी

राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून घातपात असल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच वारीशे यांच्या पश्चात त्यांची आई आणि मुलगा यांना आर्थिक साहाय्य म्हणून शासनाने १ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी अधिवेशनामध्ये केली.