JNU Clashes Again : प्रभु श्रीराम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून अवमान – जेएनयूमध्ये हाणामारी !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि साम्यवाद्यांमध्ये हाणामारी

नवी देहली : येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात अर्थात् जेएनयूमध्ये २८ ऑक्टोबरच्या रात्री कार्यकारिणीची बैठक चालू असतांना प्रभु श्रीरामाबद्दल साम्यवाद्यांकडून आक्षेपार्ह टिप्पणी केली गेली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही अपमान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही सभा बंद पाडली. ‘आधी क्षमा मागा, मगच सभा चालू करण्यास देऊ’, या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याने ती सभा साम्यवाद्यांनी रहित केली; पण त्यांनी क्षमा मागितली नाही’, अशी माहिती परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिली. या वेळी दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. या बैठकीचे व्हिडिओही समोर आले आहेत. दोन्ही गट घोषणाबाजी करतांना यात दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !