|
(जे.एन्.यू. म्हणजे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय)
नवी देहली – निर्माता विपुल अमृतलाल शहा आणि अभिनेत्री अदा शर्मा यांच्या सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला देशात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर या तिघांचा नक्षलवाद्यांवरील ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ नावाचा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (‘जे.एन्.यू.’त) याचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुदीप्तो सेन म्हणाले की, काही मूठभर साम्यवादी आहेत, ज्यामुळे जे.एन्.यू.मधील हुशार विद्यार्थ्यांची अपकीर्ती होत आहे. केवळ जे.एन्.यू.चे हुशार विद्यार्थी त्यांना पराभूत करू शकता आणि हुशार विद्यार्थ्यांच्या चांगल्या कृतींद्वारे जे.एन्.यू.चा अभिमान वाढवू शकता. आता जे.एन्.यू.ने उदयोन्मुख राष्ट्रवादी आणि राष्ट्रनिर्माते दिले आहेत, जे आता देशाला महासत्ता बनवत आहेत.
#SudiptoSen the #Director of the movie #bastarthenaxalstoryfilm appeals to the students of #JNU !
'JNU' is currently being slandered by a handful of communists, hence intellectual students can certainly defeat them!
The Students Federation of India, a #Communist organisation… pic.twitter.com/sOB8BnNWWv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2024
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (‘एस्.एफ्.आय.’च्या) विद्यार्थ्यांनी जे.एन्.यू.मध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटातील विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. ‘एस्.एफ्.आय.’च्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला. आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश रोखला. ‘एस्.एफ्.आय.’ने दोनदा सभागृहाचे दिवेही फोडले, जेणेकरून चित्रपटाचे प्रदर्शन थांबवता येईल.
संपादकीय भूमिकाहिंसक साम्यवादी संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यावर समाजविरोधी कारवाया केल्यावरून बंदी घातली पाहिजे आणि त्यांचे नेते, कार्यकर्ते, सदस्य यांना कारागृहात डांबले पाहिजे ! |