ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांचा मृत्यू
कोरोनावर ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनक’च्या लसीचे डोस ब्रिटनमध्ये दिले जात आहेत. ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी झाल्याने ७ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची माहिती ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी या वैद्यकीय प्राधिकरणाने दिली आहे.